Saturday, April 9, 2011

आशीर्वाद

“तुम्ही कोणीही या शक्तीवर अविश्वास दाखवू नका. मी सुद्धा आज ज्या प्रकारे तुम्हाला सहाय्य करीत आलो आहे तसेच सहाय्य माझा देह विसर्जित केल्यानंतरही तुम्हाला करतच राहणार आहे.या क्षेत्राचे,देवस्थानचे योग्य ते कार्य तुमच्या सर्वाच्याकडून,प्रत्येकाकडून करून घेणारच आहे.आजच्यासारखे तुम्हाला मी कोणालाही त्या काळात स्वस्थ बसू देणारच नाही.ज्यांनी ज्यांनी या शक्तीचा आशीर्वाद घेतला आहे व ज्यांचा उद्धार ,प्रगती झाली आहे त्या सर्वाना मी येथे त्यांच्या कुवतीप्रमाणे निरनिराळे काम देणार आहे.जो मागे राहील त्याला पुढच्या काळात पश्चाताप करण्याची पाळी येईल.ही शक्ती भविष्यात तुम्हाला नित्य कायम आधार देईलच याची मी तुम्हाला खात्री देतो.तुम्ही मनात कोठेही संशय आणूच नका.या यज्ञकुंडात तुमच्या सर्वाच्याकडून समिधा ह्या पडल्याच पाहिजेत.त्यातच तुमचा उद्धार होणार आहे.माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीमागे नित्य राहतीलच . श्री गुरुदेव दत्त”
- प.पू.गुरुदेव
संदर्भ :- अमृतकण क्र.२४० ,दिनांक :- २२/१/२०००