Sunday, June 5, 2011

गुरुवाणी

सामान्य मनुष्य ज्या तऱ्हेचे जीवन जगत असतो,त्यामुळे अनामिक भीती निर्माण होत असते.तोच मनुष्य जर धार्मिक जीवन जगत असेल तर ती  भीती ही दूर पळते.अनामिक भीतीमुळे नुसतीच काळजी लागलेली असते.काही लोकांना कधी कधी घाम सुटत असतो,काही काही वेळा काही लोकांचे हृदय उगीचच धडधडत ही अनामिक भीती असते.गुरुदर्शनाने हे दोष नाहीसे होतात.
      नगराचे एक प्रख्यात डॉक्टर आहेत.स्वतः डॉक्टर असल्याने त्यांचा धर्म मानण्याकडे कल कमी असे.ते डॉक्टर जेव्हा माझ्या दर्शनाला तेव्हा त्यांना बरे वाटू लागले.ते म्हणाले,"आपल्या दर्शनाने मला बरे वाटते.मला एक प्रकारची भीती वाटत असे.ती आता दूर झाली."
      सामान्य माणसाला काळजी दोन प्रकारे वाटते.आपल्या जवळ काही नाही मग आपले कसे होणार याची काळजी.तर ज्याच्याकडे खूप असते त्याला ते सांभाळायची काळजी.हाती पैसा नसाल की लोक त्याला भिकारडा म्हणतात.व पैसा असला की त्याला माजलेला म्हणतात.ही एक प्रकारची अनामिक भीती आहे.
      भय हे जसे हानिकारक आहे,तसे ते मनुष्यास योग्य मार्गावर आणण्यास कारणीभूतही ठरत असते.भयाची चाहूल लागली की, तो मनुष्य सावध होतो.त्याच्या मध्ये प्रतिक्रिया उत्पन्न होतात.तो आधार शोधू लागतो.तो आधार शोधायला लागला की तो ईश्वराच्या मार्गा प्रत येतो.

गुरुवाणी पुष्प २ विषय १२..पृष्ठ ५३

Wednesday, April 20, 2011

भक्तांचा भाव

निष्ठा जितकी दृढ तितकी गुरुकृपा लवकर प्राप्त होईल. गुरु तुम्हाला जे शिकवतात त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे.सदगुरुंविषयी स्वाभिमान निर्माण झाला तर ती शक्ती आपल्यामागे उभी राहते.
श्री रामकृष्ण उवाच

Sunday, April 17, 2011

अमृतकलश 2

आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मागण्याची आणि न मिळाल्यास नास्तिकतेकडे झुकण्याची मानवी मनाला सवय असते. त्याचा तो स्वभावधर्म आहे व हेच त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे. तो विकासाकडे कमी आणि विकाराकडे जास्त झुकतो.त्यामुळे त्याच्यात अपुरेपणा राहतो.तो दुःख भोगतो. यात ईश्वराचा दोष कुठेही नाही. ही शक्ती कधीही मानवाला दुःख देणार नाही.ती तर चिन्मयानंद अशी शक्ती आहे.