Friday, April 15, 2011

अध्यात्म आणि विज्ञान

विज्ञानपेक्षा अध्यात्म हे श्रेष्टच आहे. विज्ञान म्हणजे काय? अगोदर पासून जे अस्तित्वात आहे परंतु अंधारात आहे ते उजेडात आणणे.त्याचा कार्यकारण संबंध प्रस्थापित करणे ह्याला विज्ञानात शोध म्हणतात. विज्ञानाचे शोध शाश्वत नाहीत. ते सतत परिवर्तनीय असतात.दोनपाच वर्षामागे जो शोध केला असेल त्यावर पुन्हा संशोधन केले जाते.पुन्हा नवीन शोध लावला जातो व नवीन नियम प्रस्थापित केले जातात. अगोदर लावलेले शोध जुने होऊन बाजूला केले जातात. परंतु अध्यात्माचे तसे नाही. अध्यात्मामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत, ते तिन्ही काळामध्ये शाश्वतच राहतात,बदलत नाहीत. म्हणून आम्ही अध्यात्म श्रेष्ठ म्हणतो.

गुरुवाणी पुष्प १६