Friday, April 1, 2011

गुरुंचे महत्व

              गुरु करताना अशा काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की,ज्यांना शास्रात आधार आहे.गुरु हे वर्णाने ब्राम्हण असावेत .” वर्णानाम् ब्राम्हणो गुरुः!” देवांचे गुरु बृहस्पती,ब्राम्हणांचे गुरु देव आणि इतर सर्व वर्णाचे गुरु ब्राम्हण . श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी क्षत्रिय कुलात अवतार घेतला. पण ब्राम्हण कुळातील वसिष्ठ व सांदिपनी यांना गुरु करून जगापुढे आदर्श घालून दिला की धर्माचरण करणारा,धर्म संभाळणारा ब्राम्हण श्रेष्ठ आहे. गुरु ब्राम्हण असण्याचे आणखी कारण असे की, आशीर्वाद व शाप देण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असते . ज्ञानी, वैराग्यशील व ईश्वरी साक्षात्कारी गुरुंच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या वाणीला सामर्थ प्राप्त झालेले असते. ते कधीच शाप देत नाहीत.त्यांनी दिलेला शब्द, दिलेले आशीर्वाद यात ईश्वरी शक्ती असते व त्यामुळे काम सफल होते.