Sunday, April 3, 2011
गुरुचरित्र अवतरणिका
"श्रीगुरुचरित्र हा महान ग्रंथ आहे.त्याला वेदवाणीइतकाच अधिकार आहे. तो मंत्र स्वरूपामध्ये असून त्यामध्ये श्रीगुरुंचे वर्णन आहे. ह्याला शुचीर्भूततेची व इतर नियमपालनाची फार आवश्यकता आहे. पारायण करणा-याजवळ तेवढ पावित्र्य नसेल तर विपरीत घडण्याची शक्यता असते . श्रीगुरुना विचारल्याशिवाय श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वाचू नये किंवा पारायण करू नये , असा अलिखित नियम आहे. आजकाल शिक्षण पुष्कळ वाढले आहे .कैक लोक आम्हाला विचारतात की त्याना श्रीगुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे,वाचावे का? विचारणा-याचा एकंदर अवतार पाहून मी परवानगी देत नाही . श्रीगुरुचरित्र एकना-याला कोठेच दोष नाही. सामान्य भक्तांनी वाचावे तरी काय ? म्हणून मी माझ्या अधिकारात अवतर्णीका छापवून घेतल्यां. देवाला मी विचारले की,"सामान्य भक्तांना श्रीगुरुचरित्र वाचावयाची परवानगी नाही हे बरोबर ,परंतु अवतर्निका वाचायला दिल्या तर चालेल का?" देव अगोदर परवानगी देताच नव्हते . मी देवांशी भांडलो व परवानगी मिळवली व तुम्हाला अवतर्णीका वाचायला दिली आहे."