Thursday, March 31, 2011

व्यवस्थापन

मंदिरे ,घरे किंवा संस्था काहीही असो तेथे जळमटे लागता कामा नयेत.अशी जळमटे लागलेली दिसली तर व्यवस्थापन चागले नाही असे समजावे . व्यवस्थापनासाठी कडक स्वभावाच्या माणसांची नियुक्ती करावी. येथे मऊ स्वभावाचा माणूस उपयोगाचा नाही व्यवस्थापन असं असावं की सुई जर पडली तर तिचा आवाज तेवढयाच वातावरणात रहाव , बाहेर जाऊ नये. संस्थेविषयी निष्ठा असावी तसेच निर्माण शक्तीही असावी तरच संस्था समाजाला जास्त उपयोगी पडतील व दीर्घकाळापर्यन्त टिकतील यासाठी निर्माल्याचीसुद्धा अपेक्षा न धारणार्याे व काम चोख बजावणार्यात ट्रस्टींची नियुक्ती करावी.