Thursday, April 7, 2011

अन्नदान

अन्नदान हे आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान जरूर करावे जर तुमचा भाव श्रेष्ठ असेल तर ईश्वर तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही अन्नदान करता तेव्हा ते तुमच्या हातातून घडले पाहिजे, घरात अन्नदान केले पाहिजे तरच त्याचे सार्थक होते
पांडवांच्या चरित्रातील गोष्ट सर्वश्रुत आहे. एकदा भगवंत पांडवांच्या घरी आले व म्हणाले, ‘मला फार भूक लागली आहे.’ त्यावेळी जेवणाची वेळ होऊन गेली होती; परंतु घरात फक्तत एक तुळशीपत्र होते. भगवंतांनी अगदी सूक्ष्म रूप धारण केले व ते तुळशीपत्र खाऊन तृप्त झाले.
आजकाल लोक हॉटेलमध्ये जेवून घालतात; परंतु ते योग्य नाही घरात अन्नदान केल्याने आत्मिक समाधान मिळते शिवाय घरातील सर्वांच्या हातून ते घडत असते; म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवश्य करत जा अन्नदान केल्याने तुमच्या घरात अन्नपुरवठा राहतो व अन्नाला चव सुद्धा येते. आपण अन्नदान करीत असताना हे परमेश्वर करीत आहे आपण निमित्तमात्र आहोत अशी भावाना ठेवली पाहिजे.
संदर्भ:-गुरुवाणी पुष्प २रे