शाळीग्रामामध्ये सोने असते असे सांगितले जाते. याचा खरा अर्थ असा आहे की शाळीग्रामाला देवरूप मानून , संपुर्णपणे शरण जाऊन, अत्यंत नम्र होऊन मनोभावे जो त्याची पूजाअर्चा करील , सेवा करील तो त्याच्या जीवनात यशस्वी होईल व त्याच्या जीवनाचे सोने होईल. शाळीग्रामाची पूजा करावयाची असेल तर आधी पूर्ण माहिती करून घ्यावी.